Contact Banner

विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचे रविवारी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सावद्यात आयोजन

Vitthal-Rukmini-wedding-ceremony-to-be-organized-on-Sunday-at-the-moment-of-Vasant-Panchami


विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचे रविवारी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सावद्यात आयोजन

लेवाजगत न्यूज सावदा:- येथील गांधी चौक परिसरातील पुरातन असलेल्या श्री विठ्ठल मंदिरात रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.





    प्रतिवर्षीप्रमाणे हा सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर होत असतो यावर्षीही दिनांक २ फेब्रुवारी  रविवार रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.       

      सकाळी ८ वाजता हळदीचा कार्यक्रम  तर संध्याकाळी गोरज मुहूर्तावर लग्नाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी शहराच्या प्रमुख मार्गावरून सवाद्य वरातीचा कार्यक्रम असेल.तरी आपण या  शहरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात सर्व भाविकांनी बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन गांधी चौक मित्र मंडळ व विठ्ठल मंदिर तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.