Header Ads

Header ADS

तरुणांची जुन्या वादातून निर्घृण हत्या पाच जण गंभीर जखमी

Five-people-seriously-injured-in-brutal-murder-over-old-dispute-of-youths


तरुणांची जुन्या वादातून निर्घृण हत्या पाच जण गंभीर जखमी

लेवाजगत न्यूज जळगाव:– जळगाव शहरातील पिंप्राळाभागातील हुडको परिसरात झालेल्या जुन्यावादातून घरातील कुटुंबावार चॉपर आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली.      या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. घटनेत जखमी झालेल्या ५ जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुकेश रमेश शिरसाठ (वय- २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव)असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

   या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबावर जुन्या वादातून सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता,चाकू आणि लाकडी काठीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये निळकंठ सुखदेव शिरसाट वय-४५, कोमल निळकंठ शिरसाठ वय-२०, निळकंठ शिरसाठ वय-२५,ललिता निळकंठ शिरसाठ वय-३० आणि मुकेश रमेश शिरसाठ वय-२६, सनी निळकंठ शिरसाठ वय २१ सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव हे गंभीर जखमी झाले. 

     त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यातील मुकेश रमेश शिरसाठ वय-२६ या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

    यावेळी महाविद्यालयात मित्र परिवारासह नातेवाईकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.