Contact Banner

जळगावमध्ये मोठा अपघात! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं


 जळगावमध्ये मोठा अपघात! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं

लेवाजगत न्युज जळगाव:-जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलंI. यामध्ये काही प्रवाशांची मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जळगावच्या पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या. मात्र भुसावळकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या भीषण अपघाताने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही ट्रेन परधाडे रेल्वे स्थानकाजवळ येत होती. तितक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. प्रवाशी या प्रकाराने चांगलेच हादरून गेले होते. त्यामुळे 35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्याने बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. 

    बातमी अजून अपडेट होत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.