महिलांनंतर पुरुषांचाही डंका, पहिल्या खो-खो विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरलं, अंतिम सामन्यात नेपाळचा धुव्वा
महिलांनंतर पुरुषांचाही डंका, पहिल्या खो-खो विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरलं, अंतिम सामन्यात नेपाळचा धुव्वा
खो-खो विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र, पहिल्या डावात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत 26 गुण मिळवले. या कालावधीत नेपाळ संघाला एकही गुण घेता आला नाही.
नेपाळला पहिल्या डावात खात देखील उघडता आलं नाही. तर दुसऱ्या डावात नेपाळने पुनरागमन करत चांगले गुण मिळवले. दुसऱ्या डावात नेपाळने 18 गुणांची कमाई केली. मात्र, दुसऱ्या डावातही टीम इंडिया आघाडी घेण्यात यशस्वी ठरली. दुसऱ्या डावानंतर भारताकडे आठ धावांची आघाडी होती.
तिसऱ्या आणि चौथ्या डावात भारताचं दमदार प्रदर्शन
भारतीय पुरुष खो-खो संघाने या विश्वचषकात दुसऱ्यांदा नेपाळ संघाचा पराभव केला आहे. याआधी भारत आणि नेपाळमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही टीम इंडिया विजय मिळवण्यात यशस्वी ठरली होती. पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाच्या पहिल्या सत्रात एकूण 20 संघांनी भाग घेतला.
पुरुष संघाच्या अगोदर महिलांनीही विश्वचषक जिंकला
पुरुषांच्या सामन्यापूर्वी महिला संघाचा अंतिम सामना खेळवण्यात आला. जिथे भारतीय महिला संघाने नेपाळचा 78-40 असा पराभव करून विश्वचषक जिंकला. पुरुष आणि महिलांनी खो-खो विश्वचषक जिंकल्याने भारतासाठी आजचा दिवस दुहेरी आनंद देणारा ठरलाय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत