निंभोरा येथिल प्रेमीयुगुलाची आत्महत्या प्रेमाला नकार दिल्याने घेतला निर्णय
निंभोरा येथिल प्रेमीयुगुलाची आत्महत्या " प्रेमाला नकार दिल्याने घेतला निर्णय"
लेवाजगत न्युज निंभोरा बुद्रुक:-
परिसरातील इंदिरानगर भागात एका प्रेमीयुगुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अजय अरुण तायडे (वय २५) व ३० वर्षीय महिलेने जीवनयात्रा संपविली. मृत तरुण व महिला नात्यागोत्यातील होते. ते एकमेकांवर प्रेम करीत असल्याचे समजते. मात्र, त्यांच्या प्रेमास विरोध होत असल्याने त्यांनी जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. याबाबत वैभव राजू तायडे (रा. रावेर) यांनी दिलेल्या माहितीवरून निंभोरा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अविनाश पाटील तपास करीत आहेत. मृत तरुण घरातील एकुलता कमावता असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रावेर येथून शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत