प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळाच्या नवीन कार्यकारी घोषित
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळाच्या नवीन कार्यकारी घोषित
लेवाजगत न्यूज पिंपरी चिंचवड:-आज दिनांक २६ रोजी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ पिंपरी-चिंचवड यांचे मार्फत भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल ज्ञान मंदिर, निगडी येथे डिगांबर धनाजी पाटील,आप्पा खाचणे,घनश्याम जावळे, मधुकर पाचपांडे,डी पी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आज रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम साठी पिंपरी चिंचवड शहरातील लेवा पाटीदार समाजाच्या सर्वच मंडळांची पदाधिकारी, समाजातील मान्यवर तसेच लेवा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नामदेवदादा ढाके यांनी जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ, पिंपरी-चिंचवड च्या नवीन कार्यकारी मंडळाची घोषणा केली, त्यानुसार मंडळाचे नवीन कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले.
अध्यक्ष मिलिंद दादा चौधरी,कार्याध्यक्ष भूषण पाटील,खजिनदार कैलास रोटे,सचिव दीपक चौधरी,सहसचिव सचिन वाणी,सहखजिनदार सारंग चौधरी,सदस्य विनय चौधरी, सदस्य कल्पेश चौधरी,सदस्य कैलास पाटील,सदस्य ज्ञानेश्वर बऱ्हाटे,सदस्य निकिता चिनावले यावेळी उपस्थित लेवा समाज बांधवांनी नवनियुक्त कार्यकारी मंडळाचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्व कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत