पालिका सेवानिवृत्त कर्मचारी सुमनबाई मोती भेरवा यांचे वृद्धापकाळाने निधन
पालिका सेवानिवृत्त कर्मचारी सुमनबाई मोती भेरवा यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवा जगत न्यूज सावदा- येथील स्वामीनारायण नगर परिसरातील रहिवासी पालिका सेवानिवृत्त कर्मचारी सुमनबाई मोती भेरवा यांचे आज मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजता वृद्धापकाळाने ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार रोजी दुपारी स्वामीनारायण नगर भागातून दुपारी दोन वाजता निघेल.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,चार मुली,सुना, नातू, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या पालिका संचलित एन व्ही पाटील कन्या शाळेचे निवृत्त लिपिक मोती भेरवा यांच्या पत्नी तर कर्मचारी शेखर भेरवा व दिलीप भेरवा यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत