सावदा नगरपरिषदेच्या वतीने थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम
सावदा नगरपरिषदेच्या वतीने थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम
लेवाजगत न्यूज सावदा:- सावदा नगरपालिकेने थकबाकी वसुलीसाठी पथके निर्माण केली असून, आज या पथकांद्वारे थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी करापोटी केले.
७ गाळे सील व दोन नळ कनेक्शन कट करण्यात आले आहेत. यापुढेही अशी धडक मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी आपल्या मालमत्ता कर व पाणीपट्टी रकमेचा भरणा करावा. तसेच गाळेधारकांनी इमारत भाडे भरणा करावा अन्यथा थकबाकीदारांविरोधात जप्ती वॉरंट बजावून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल. ज्या नळ धारकांचे नळाची पाणीपट्टी बाकी असेल त्यांनी त्वरित भरण करावा. अन्यथा त्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येईल असे आवाहन नगरपरिषेच्या वतीने करण्यात येत आहे. सदर मोहीम मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी, सहाय्यक कर निरीक्षक मोतीलाल कोळी, वसुली लिपिक अरुण ठोसरे, वसुली लिपिक अमित तडवी शिपाई संदीप वाणी,समुदाय संघटक महेश इंगळे यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत