Contact Banner

पं.दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १६ जानेवारीला आयोजन;ईच्छुक उमेदवारांना सहभागी होण्याचे आवाहन

Pandit-Deendayal-Upadhyay-Employment-Meeting-to-be-organized-on-January-16-invites-interested-candidates-to-participate


पं.दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १६ जानेवारीला आयोजन;ईच्छुक उमेदवारांना सहभागी होण्याचे आवाहन

लेवाजगत न्यूज जळगाव :  जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने पं.दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्य़ात आले आहे. 

 हा रोजगार मेळावा दि.१६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन विदयापीठतील प्रधान सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सर्वसाधारण १०वी, १२ वी, सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए / एम.बी.ओ सर्व पदवीधारक असे १५०० पेक्षा जास्त रिक्तपदांबाबत विविध नामांकित आस्थापनाकडुन ऑनलॉईन पदध्तीने कळविण्यात येणार आहेत.

                      https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

 या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या उमेवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

 या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लाय करण्यासाठी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुल अप्लाय करायचे आहे. तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यात मुलाखतीच्या दिवशी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

                  काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ०९.४५ ते संध्या.०६.१५ या वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७ २९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्द्योजकता सहाय्यक आयुक्त संदिप गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.