जिल्हाधिकारी कार्यालयात 6 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयात 6 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
लेवाजगत न्यूज जळगाव : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी दिली आहे.
या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत