प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात भीषण आग, एकापाठोपाठ सिलिंडरचे तीन स्फोट!
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात भीषण आग, एकापाठोपाठ सिलिंडरचे तीन स्फोट!
वृत्तसंस्था उत्तर प्रदेश-उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्याला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. या आगीचे लोट दूरहून दिसत आहेत.
प्रयागराजमधील महाकुंभाच्या ७ व्या दिवशी रविवारी मेळा परिसरात भीषण आग लागली. तंबूत स्वयंपाक करत असताना ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. आगीने अधिक तंबूंना वेढले, ज्यामुळे त्यामध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरमध्ये सतत स्फोट होत राहिले. आतापर्यंत 20 ते २५ तंबू जळाले आहेत.
आखाड्याच्या समोरील रस्त्यावर असलेल्या लोखंडी पुलाखाली ही आग लागली आहे. अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले आहे. परिसर सील करण्यात आला आहे.
जोरदार वाऱ्यामुळे आग पसरण्याचा धोका आहे. सध्या कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. आज मुख्यमंत्री योगी देखील प्रयागराजला पोहोचले आहेत. त्यांनी हेलिकॉप्टरमधून महाकुंभमेळा परिसराची पाहणी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत