शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वाटप
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वाटप
लेवाजगत न्युज उरण (सुनिल ठाकूर): -स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भगवा जल्लोष अंतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शखाली विभाग प्रमुख आमदार महेश सावंत यांनी माहीम विधानसभेतील शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून दिले.
त्याचे वाटप शाखाप्रमुख संजय भगत यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभादेवी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री खाडे सर तसेच किरण पाटील सर यांच्या उपस्थितीत केले. त्यावेळी मा. शाखाप्रमुख लक्ष्मण भोसले, विभाग संघटिका रेखा देवकर,शाखा संघटिका कीर्ती मस्के, शाखा संघटक रत्नाकर चिरनेरकर,कार्यालय प्रमुख कुणाल आंब्रे, ज्येष्ठ शिवसैनिक रवी गजने ,उल्हास कदम,म.उपशाखासंघटक अर्चना पाटील, महिला गटसंघटिका शितल नागवेकर सुप्रिया चव्हाण,युवा सेनेचे साहिल कदम, तन्मय विलनकर, उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत