!! झाली साई कृपा झाली, दिंडी प्रति शिर्डीला निघाली.!!
!!झाली साई कृपा झाली, दिंडी प्रति शिर्डीला निघाली.!!
लेवाजगत न्युज उरण : सुनिल ठाकूर :-स्व.शालिनी ताई घरत यांनी गेली 20 वर्षा पासून श्री साई शक्ती मंडळ उरण विभागा तर्फे दरवर्षी नवीन शेवे ते प्रति शिर्डी (शिरगांव) अशी श्री साई पालखी दिंडी महिला व पुरुषां सह निघते. स्व. शालिनी ताईंचा वसा असाच पुढे त्यांच्या परिवारा कडून होत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील साई बाबा पालखी दिंडी महिला व पुरुषां सह श्री रत्नेश्वरी साई प्रेरणा भजन मंडळ यांच्या भजना सह यात्रा गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी राम मंदिर नवीन शेवे येथून सकाळी 8 वाजता बाबांची आरती करून प्रति शिर्डीला प्रस्थान झाले. असून ही पायी पालखी दिंडी 26 जानेवारी 2025 रोजीप्रति शिर्डी येथे संध्याकाळी 6 वाजता धुपारती साठी पोहचणार आहे.
पायी पालखी दिंडी नवीन शेवे येथून राम मंदिरातून निघाल्यावर शेवे गावात पालखी दिंडीचे एकनाथ शेठ घरत यांच्या परिवारा कडून भव्य स्वागत करून पद यात्री ना चहा नाष्टाचे देण्यात आले. यावेळी कमलाकर घरत, कृष्णा घरत, हिराजी घरत यांच्या परिवारा देखील पालखी चे दर्शन घेतले.
दुपारी पायी पालखी मध्यान्ह आरती करिता जसखार येथे रत्नेश्वरी मंदिरात पोहचली. दुपारच्या विश्रांती नंतर पायी पालखी जासई येथे पोचल्या वर पायी पालखी चे मनोहर पाटील यांच्या परिवारा कडून स्वागत करून पद यात्री ना चहा नाष्टा देण्यात आला. पायी पालखी रात्री च्या मुक्काम साठी बंबावी पाडा येथे सागर मढवी यांच्या परिवारा कडे थांबली. दुसऱ्या दिवशी. पायी पालखी अजीवली येथे मध्यान्ह आरती करिता पोचल्या वर पायी पालखी दिंडी चे परशुराम माळी यांच्या परिवारा कडून जंगी स्वागत करुन महा प्रसाद देण्यात आला. त्या नंतर दुपार च्या विश्रांती नंतर जे. एम. म्हात्रे यांच्या नढाळ येथील पंचायतन मंदिरात रात्री च्या मुक्का मा साठी पोहचली. सदर पायी पालखी दिंडी साठी संचालक रुपेश घरत, खजिनदार, तथा मार्गदर्शक रामचंद्र घरत, अध्यक्ष विजय पाटील, कार्याध्यक्ष हरेश्वर घरत, उपाध्यक्ष हरेश्वर ठाकूर, मनीषा घरत, सेक्रेटरी मनोहर तांडेल, संपर्क प्रमुख सुनिल पाटील, सुनिल घरत, सह सेक्रेटरी नितीन घरत, शकुंतला ठाकूर,सह खजिनदार जगदीश भोईर,मिलिंद तांडेल,, सल्लागार रामदास म्हात्रे, गणेश ठाकूर, दिलीप कडू, अजय दर्णे, नम्रता ठाकूर, वंदना कडू, कलावती कडू, आदी सह सदस्य मेहनत घेत आहेत. पालखी दिंडी सांगता प्रित्यर्थ 28 जानेवारी 2025 रोजी नवीन शेवे येथे सत्यनारायण महा पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व साई भांडारा चा आस्वाद घेण्याचे आवाहन श्री साई शक्ती मंडळ उरण तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत