Header Ads

Header ADS

सर्वांत सुंदर महाकुंभमध्ये साध्वी म्हणून प्रसिद्ध झालेल्या हर्षाचं सत्य आलं समोर; साध्वी नव्हे तर..

 

The truth of Harsha, who became famous as a Sadhvi in ​​the most beautiful Mahakumbh, came to light if she was not a Sadhvi.

सर्वांत सुंदर महाकुंभमध्ये साध्वी म्हणून प्रसिद्ध झालेल्या हर्षाचं सत्य आलं समोर; साध्वी नव्हे तर..

लेवाजगत न्यूज प्रयागराज-सोमवार १३जानेवारीपासून महाकुंभला सुरुवात झाली. तिथले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका साध्वीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. मात्र आता त्या साध्वीचं सत्य समोर आलं आहे.

   महाकुंभच्या पहिल्याच दिवशी सर्वांत सुंदर साध्वी म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली हर्षा रिछारियाचा जुना व्हिडीओ व्हायरल होताच सत्य समोर आले आहे. कुंभमेळ्यात हर्षा दोन वर्षांपूर्वी साध्वी बनल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता मला साध्वी म्हणू नका, असं तिने स्पष्ट केलंय. महाकुंभमधील सर्वांत सुंदर साध्वी अशी चर्चा झाल्यानंतर आता हर्षा साध्वी नसल्याचं म्हटलं जात आहे. हर्षाचे महाकुंभमधील फोटो आणि व्हिडीओ पहिल्या दिवसापासूनच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. इतकंच नव्हे तर यामुळे हर्षाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सचा आकडा अत्यंत जलदगतीने वाढत चालला आहे. गेल्या काही तासांत तिच्या फॉलोअर्सची संख्या काही हजारांनी वाढली आहे.



    शनिवारी महाकुंभमध्ये निरंजनी आखाड्याच्या मिरवणुकीत हर्षाला पाहिलं गेलं होतं. यावेळी ती इतर संतांसोबत रथात बसलेली दिसली. कुतूहलापोटी काही इन्फ्लुएन्सर, युट्यूबर्स आणि माध्यमांशी तिच्याशी संवाद साधला. “इतकी सुंदर दिसतानाही तू साध्वी का झालीस”, असा प्रश्न एकाने विचारल्यावर हर्षाने सत्य सांगितलं नव्हतं. उलट गेल्या दोन वर्षांपासून मी साध्वी बनली असून मला माझ्या आयुष्यात एक वेगळीच शांती अनुभवता येतेय, असं ती म्हणाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हर्षाचं सोशल मीडियावरील अकाऊंट पाहिलं. त्यावर तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये ती अँकरिंक करताना दिसतेय. हर्षाचा ग्लॅमरस अंदाजही नेटकऱ्यांना दिसला.

  त्यानंतर एका टीव्ही चॅनलशी बोलताना हर्षाने स्पष्ट केलं, “मी साध्वी होण्याच्या दिशेने पावलं टाकतेय. मात्र मी अजून साध्वी झाली नाही. त्यासाठी एक दीक्षा घ्यावी लागते, अनेक विधी करावे लागतात. माझा पोशाख पाहून लोकांनी मला साध्वी असं म्हटलं. मला सर्वांत सुंदर साध्वी असं नाव दिलं गेलं. हे सर्व पाहून मला बरं वाटलं. पण मला साध्वी म्हणणं योग्य नाही, असं मला वाटतं. माझ्या गुरुदेवांनीही असा आदेश दिलेला नाही. त्यामुळे मला कृपया साध्वी म्हणू नका.”

  हर्षा ही अँकर, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. महाकुंभमध्ये येण्यापूर्वी तिचे सोशल मीडियावर जवळपास साडेपाच लाख फॉलोअर्स होते. आता तो आकडा वाढून आठ लाख इतका झाल आहे. ग्लॅमरच्या दुनियेतून ऋषी-मुनी, साधू-संतांच्या महाकुंभमध्ये येण्याबाबत ती पुढे म्हणाली, “काही गोष्टी आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात. आपल्या आयुष्यात कधी काय घडावं, हे आधीच ठरलेलं असतं. मी माझं आयुष्य खूप चांगल्याप्रकारे जगतेय, परदेशात फिरतेय. आता काही काळ मी या सर्वांमधून ब्रेक घेतला आहे. मी गुरुदेवांच्या शरणी आले आहे. इथलं जीवन पूर्णपणे वेगळं आहे. इथे कोणताच दिखावा नाही, फक्त देवाचं नाव आहे.”

   संन्यास घेण्याविषयी हर्षा पुढे म्हणाली, “मी माझ्या गुरुदेवांना संन्यास घेण्याबद्दल सांगितलं, पण त्यांनी मला नकार दिला. याबद्दल त्यांनी मला खडसावलं होतं. सध्या तुला कौटुंबिक जीवनातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे, असं त्यांनी सांगितलं. त्या जबाबदाऱ्या मला पूर्ण कराव्या लागतील. तोपर्यंत मी माझी साधना करत राहीन आणि माझं काम करत राहीन.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.