सावद्यात श्रीमद् देवी भागवत महापुराण कथेचे आयोजन
सावद्यात श्रीमद् देवी भागवत महापुराण कथेचे आयोजन
लेवाजगत न्युज सावदा:- सावद्यात श्रीमद देवी भागवत महापुराणाचे कथेचे आयोजन दिनांक 17 ते 25 जानेवारी 2025 पर्यंत दररोज रात्री 7 ते 10:30 राहणार आहे. सावदा येथील श्री स्वामी कृष्णगिरी महाराज श्री सोमवार गिरी मढी महंत यांच्या आशीर्वादाने कथाव्यास बालविदुषी श्री 108 स्वामी कात्यायनी गिरी दीदीजी हे करणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे माळीवाडा गवत बाजार सावदा येथे संघर्ष मित्र मंडळ हे सप्ताहाचे दरवर्षी आयोजन करत असतात. यावर्षी सुद्धा श्रीमद् देवी भागवत महापुराणचे आयोजन करण्यात आलेले आहे.
खालील प्रमाणे कथा राहणार
- 17/01/2025 शुक्रवार रोजी श्रीदेवी महात्म्य कथा
- 18/01/2025 शनिवार रोजी श्रीदेवी महिमा आणि नियम 19/01/25 रविवार रोजी हयग्रीवतार
- 20/01/2025 सोमवार जनमेय कुळ वर्णन
- 21/01/2025 मंगळवार जनमेय सर्पयज्ञ
- 22/01/2025 बुधवार श्री 52 शक्तिपीठ वर्णन
- 23/01/2025 गुरुवार कन्या पूजन महत्व
- 24/01/25 रोजी तारकासुर, शुम्भनिशुम्भादी दैत्य वध
- 25/01/2025 शनिवार रोजी श्री शक्ती महिमा सुरत समाधी कथा
अशाप्रकारे श्रीमद् देवी भागवत महापुराणाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी परिसरातील नागरिकांना मंडळातर्फे आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कथेचा लाभ घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत