सावदा पोलिसांनी सुकी नदीच्या पुलावर दीड लाखांचा गुटखा पकडला
सावदा पोलिसांनी सुकी नदीच्या पुलावर दीड लाखांचा गुटखा पकडला
लेवाजगत न्यूज सावदा- येथून जवळच असलेल्या चिनावल ते उटखेडा जाणाऱ्या रस्त्यावरील सुकी नदीच्या पुलावर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधीत तंबाखू व विमल गुटखा सावदा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पडकला असून तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सावदा पोलिसांनी १ लाख ६१ हजार १०५ रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. चिनावल व उटखेडा शिवारात दुचाकीवर रोझोदा येथील अजय शांताराम कोळी (वय ३७) व चिनावल येथील यश उर्फ योगेश पीतांबर चौधरी (वय २७) व लोहारा येथील अस्लम सलीम तडवी (वय २९) हे गुटखा वाहतूक करत असताना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर दुचाकी (एमएच १९, बीए ७५७८) सह १ लाख ६१ हजार १०५ किमतीचा गुटखा जप्त केला. या घटनेचा तपास सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गरजे पोलीस उपनिरीक्षक व निलेश बाविस्कर यांनी कारवाई केली ,सावदा पोलीस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत