Contact Banner

स्वरकुल ट्रस्ट पुणे च्या वतीने कलागुण गौरव सम्मेलन संपन्न !!

Swarkul-Trust-Pune-on-behalf-of-Kalagun-Gaurav-Symbol-Samphan


स्वरकुल ट्रस्ट पुणे च्या वतीने कलागुण गौरव सम्मेलन संपन्न !!

लेवाजगत न्युज उरण(सुनिल ठाकूर):- नुकताच पुणे येथे सारसबाग जवळ विशाल सह्याद्री सभागृहात "प्रजासत्ताक" दिनाचे औचित्य साधून 'स्वरकुल ट्रस्ट पुणे' आयोजित, जीवनकला अकॅडमी प्रस्तुत भव्य वार्षिक कलागुण गौरव सम्मेलन संपन्न झाले.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे शब्दश्री विलास देवळेकर (मुंबई),  डॉ. धीरजलाल कल्याणजी (मा नगरसेवक), डॉ सुभाष माने (प्रसिद्ध समाजसेवक), डॉ अजय न. अपामार्जने (राष्ट्रीय किर्तनकार) आणि श्रीमती सुषमा आपटे जोशी (माउथ ऑर्गन वादक) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व भारतमातेच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. 

 प्रमुख पाहुण्यांचा परिचय  डाॅ विणा त्यागराज खाडिलकर यांनी केले. त्या नंतर, पाहुण्यांच्या गळ्यात शैला  घालून, सन्मानपत्र व राष्ट्रीय रत्न स्मृती चिन्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

     महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून छोट्या विद्यार्थ्यांनी अनेक गायनाचे प्रकार सादर करण्यात आले आहे. त्यात निवृत्त प्रिन्सिपॉल वयाच्या ६५व्या वर्षी गायनाचे धडे घेत असल्याने, एक हिंदी गीत सादर केले. एका छोट्या विद्यार्थ्यीनींने किर्तन प्रवचन सादर केले. त्या नंतर, मान्यवरांचे राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या भाषणामध्ये प्रथम मा. शब्दश्री विलास देवळेकर यांनी आपल्या स्टाईलमध्ये म्युझिकल इको साऊंड सिस्टीम मध्ये भाषण केले. उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रमाणात दाद दिली. मा. डॉ धीरजलाल कल्याणजी एक हिंदी गीत सादर केले. मा डाॅ सुभाष माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा डाॅ अजय न. अपामार्जन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि श्रीमती सुषमा आपटे जोशी यांनी माउथ ऑर्गन वाजवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच मुंबईचे प्रसिद्ध जेष्ठ गायक व संगीतकार एकनाथ धयाळकर, हे आवर्जून उपस्थित राहिल्या बद्दल, त्यांचेही शैला गळ्यात घालून 'स्वागत' केले. त्या नंतर भारतातून आलेल्या निवडक लोकांना, त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रानुसार, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैला- पदक गळ्यात घालून, सन्मानपत्र व राष्ट्रीय रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या नंतर, प्रमुख पाहुण्यांच्या  हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना पदक गळ्यात घालून 'सत्कार' करण्यात आले.

          पुन्हा छोट्या विद्यार्थी गायकांचा आप आपल्या साहित्य वाजवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि शेवटी, गीतकार विलास देवळेकर लिखित "हा राष्ट्रध्वज आपुला" हे गीत वाजवून 'समारोप' करण्यात आले. 

     आणि ह्या कार्यक्रमाचे सौ स्मिता वि. अपामार्जने यांनी पुरस्कार समितीचे उत्तम कार्य सांभाळले. तसेच उत्कृष्ट सुत्रसंचालिका आणि उत्तम आयोजिका डॉ. विणा त्यागराज खाडिलकर यांनी उत्तम नियोजन केले आहे. आणि सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.