Header Ads

Header ADS

मासे मिळणार फक्त ५९ रुपयात! ठाण्यात यंदाही दर्यादारी सी-फूड फेस्टिव्हल’मध्ये खवय्यांसाठी पर्वणी

 

This year, foodies will get Parvani fish for just Rs. 59 at the Daryadari Seafood Festival in Thane.

ठाण्यात यंदाही दर्यादारी सी-फूड फेस्टिव्हल’मध्ये खवय्यांसाठी पर्वणी
मासे मिळणार फक्त ५९ रुपयात!

लेवाजगत न्युज उरण (सुनिल ठाकूर) :-होडीत असलेल्या आगरी कोळी थीम रेस्टॉरेंट दर्यादारीचे तृतीय वर्षपुर्तीनिमीत्त ठाण्यात खास खवय्यांसाठी 'दर्यादारी सी-फुड फेस्टीवल’ चे आयोजन केले आहे.

आगरी माणसं आणि त्यांचा आदरतिथ्य जगजाहिर आहेत, हाच आदरतिथ्य आपण सेवेच्या माध्यमातून द्यावा यासाठी ठाण्यातील स्थापत्य इंजीनियर (Engineer) असलेले सर्वेश तरे यांनी ‘ओ नाखवा बोटीन जेवाल का?’ म्हणत 19 जानेवारी २०२२ रोजी ‘दर्यादारीचे’ आमदार राजु पाटील,बिगबॉस फेम दादुस आणि तसेच टाईमपास मुव्ही फेम जयेश चव्हाण यांच्या हस्ते धुमधडाक्यात उद्घाटन केले होते. खर तर सर्वेश यांच्या आईंना लोकांना जेवन करून घालणं फार आवडत असत त्या विविध खाद्यउत्सवात आपली स्टॉल उभारत असत त्याना महाराष्ट्र शासनाचा हिरकणी लघुउद्योजिका पुरस्कार देखील मिळाला परंतू कोरोना (Corona) काळात आई गेल्या नंतर आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वेश तरे यांनी आपल्या आईंचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी २०२२ मध्ये हे पाऊल उचलले आणि आता २०२५ मध्ये तृतीय वर्षपुर्तीनिमीत्त ‘दर्यादारी फुड फेस्टिव्हल’साजरा करतायत. 


तीन वर्ष चांगल्या वाईट अनुभवात दर्यादारी चा व्हरका गुगलवर ५ पैकी थाटात ४.५ मानांकन घेऊन किनाऱ्यावर जोरात चालू आहे. इतकच काय मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतसुध्दा दर्यादारी विषय प्रश्न विचारला गेला होती इतकी खव्वयांनी दर्यादारीला पसंती दिली आहे.

या वर्षभरात त्यांच्या सेवेत आगरी मेजवाणीसह फ्युजन पदार्थ आणि विविध मास्टर्स शेफ ना घेऊन मेनू मध्ये आपल्या भन्नाट स्वादिष्ट अशा रेसीपी त्यांनी तयार केल्या आहेत. दर्यादारी उपहारगृहात अस्सल पारंपारिक आगरी मसाल्यातील मेजवाणीही मिळते त्यासोबत इन्डोचायनीज अन भारतीय खाद्यपदार्थांची सुध्दा मेजवाणी उपलब्ध आहे. 


येत्या १९ जानेवारी आपल्या दर्यादारी हॉटेलला ३ वर्ष पुर्ण होत असुन याच निमीत्त सर्वेश तरे ‘दर्यादारी सी-फुड फेस्टीवल’ ठाण्यातील कशेळी येथे संपन्न होत आहे. १७ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान असलेल्या खाद्य महोत्सवात खवय्यांना ५९ रुपयांपासून मासे सोबत १४९ रू पासून मासळी थाळी उपलब्ध आहे. ७९ रुपयांपासून बिर्याणी ते कोलबी,सुरमई अशा बिर्याणीसुध्दा उपलब्ध आहे. सोबतच थंडीचा महिना असल्याने खास आकर्षण ‘रायगडची पोपटी’ चा आता या सी-फुड फेस्टीवल मध्ये तुम्हाला आस्वाद चाखायला मिळेल.

आमचं ठाम मत आहे हॉटेल मध्ये फक्त जेवायचं नसतं तर जेवण अनुभवायचं असं म्हणत होडीत असलेल्या ठाण्यातील या हॉटेल मध्ये सर्वेश तरे सारे मासे प्रेमी अन खवय्यांनी ठाण्यात होणाऱ्या या फुड फेस्टीवल साठी आमंत्रित केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.