सावदा ते सुना सावखेडा रविवारी पदयात्रा
सावदा ते सुना सावखेडा रविवारी पदयात्रा
लेवाजगत न्यूज सावदा:- येथे प्रति वर्ष प्रमाणे वडताल धाम अंतर्गत येणारे श्री स्वामीनारायण मंदिर सावदा यांच्या वतीने सावदा ते सुना सावखेडा येथील कष्टभंजन देव पदयात्रा रविवारी आयोजन.
सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरा मार्फत दरवर्षी वेगवेगळ्या देवस्थानावर पदयात्रा निघत असते यावर्षीही परमपूज्य शास्त्री भक्ती प्रकाश दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कोठारी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी, शास्त्री धर्म किशोरदासजी यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी सावदा ते सुना सावखेडा कष्टभंजन देव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रा सकाळी श्री स्वामीनारायण मंदिर येथून पाच वाजता निघून शहराच्या प्रमुख मार्गावरून निघून पिंपरूळ ,आमोदा,बामनोद मार्गे सुना सावखेडा अशी निघेल. तरी ज्या भक्त भाविकांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी रविवारी सकाळी पाच वाजता मंदिरात उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर ट्रस्टी तर्फे करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत