Header Ads

Header ADS

वडगाव जवळ सुकी नदी पुलावर अपघात,ब्रेझा कारने मोटरसायकल उडवली एक ठार २ जखमी

 



वडगाव जवळ सुकी नदी पुलावर अपघात,ब्रेझा कारने मोटरसायकल उडवली एक ठार २ जखमी

वडगाव जवळ सुकी नदी पुलावर अपघात,ब्रेझा कारने मोटरसायकल उडवली एक ठार २ जखमी


लेवाजगत न्यूज सावदा:- बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर वडगाव तालुका रावेर जवळ १४  तारखेला सुकी नदी पुलावर एका ब्रेझा कारने मोटरसायकलला उडवून टाकल्याने जावेद सत्तार तडवी वय ३९ यांचा मृत्यू झाला तर अझरुद्दीन उर्फ बबलु अशरफ तडवी आणि वसीम अशरफ तडवी राहणार वडगाव हे गंभीर जखमी झाले. हा अपघात जावेद आणि त्याच्या मित्रांना सावदा येथून घरी परतत असतांना झाला."तीघांना एका पांढ-या रंगाचे ब्रेझा कारवाल्याने उडवून दिले असून त्यांना जबर मार लागला आहे.मदतीला आलेल्या नागरिकांनी कारचा फोटो काढला.


   तक्रारीत दर्शविले आहे की, सुकी नदी पुलावर समोरून येत असलेल्या पांढ-या रंगाच्या ब्रेझा कारच्या (क्रमांक MH-19-CY-1007) चालकाने त्यांची मोटरसायकल (क्रमांक MH-48-BX-7926) उडवून टाकली. अपघातामध्ये दोघांना गंभीर दुखापती झाल्या असून, जावेद सत्तार तडवी यांचा सावदा येथे डॉ उमेश पिंपळे यांच्या दवाखान्यात मृत्यू झाला. दोघा जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे एका रुग्णावर सावदा येथे तर गंभीर जखमी रुग्णावर जळगाव येथे उपचार सुरू आहे.

हा अपघात सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संबंधित अधिकारी व पोलीस कर्मचारी करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.