ईश्वराची भक्ती केल्याने जीवनाला अर्थ मिळतो - शिवचरित्रकार ह.भ.प.वैष्णवी ताई महाराज
ईश्वराची भक्ती केल्याने जीवनाला अर्थ मिळतो - शिवचरित्रकार ह.भ.प.वैष्णवी ताई महाराज
हेचि थोर भक्ति आवडते देवा ।
संकल्पावी माया संसाराची ।।
ठेविले अनंते तैसेचि रहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ।।
वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ ।
भोगणे ते फळ संचिताचे ।।
तुका म्हणे घालू तयावरी भार ।
वाहू हा संसार देवापायी ।।
ह्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून माणसाला मिळालेल्या दुर्लभ नरदेहाचं महत्त्व आणि भक्तीमार्गाचं महत्त्व अधोरेखित होते, मनुष्यदेहाने मिळवलेल्या संधीचा उपयोग ईश्वराची भक्ती करण्यासाठी करायला हवा असे हंबर्डी येथे संगितमय तुलसी रामायण व अखंड हरिनाम संकिर्तन साप्ताहाच्या निमित्ताने वैष्णवी ताई महाराज यांनी कीर्तनात ईश्वराची भक्ती करण्यासाठीच मानव जन्म होय.
मनुष्यदेहाचे महत्त्वाचे तत्व म्हणजेच इतर प्राण्यांपेक्षा माणसाला मिळालेले हे शरीर हे अत्यंत भाग्यवान आहे, ज्यामुळे आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्त होऊ शकतो. भक्तीमार्गाचे महत्त्व मनोभावे सेवा करणाऱ्या भक्ताला विचारा... ईश्वराची भक्ती केल्याने जीवनाला अर्थ मिळतो आणि मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत