Contact Banner

भक्त हा निस्वार्थी असावा भगवंतांच्या विचारांचे आचरण आणणारा असावा -सावदा येथील धर्मसभेत उपाध्याय मुनीश्री गुरुवर्य विशेष सागरजी महाराज

 





भक्त हा निस्वार्थी असावा भगवंतांच्या विचारांचे आचरण आणणारा असावा -सावदा येथील धर्मसभेत उपाध्याय मुनीश्री गुरुवर्य विशेष सागरजी महाराज

प्रतिनिधी सावदा- येथील चंद्रप्रभू जैन मंदिरात महावीर पंचकल्याणक महोत्सव व मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात उपाध्याय  मुनीश्री विशेष सागरजी महाराज यांचे भ्रमंती करीत असताना सावदा शहरात मंगळवार संध्याकाळी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुर्गा माता चौकात जेसीपी मधून मुनींच्या  वरती पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांसह लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     मंदिरात आपल्या गुरूंचे दर्शन घेतल्यानंतर गुरुवर्य मंदिराच्या प्रांगणात धर्मसभेत उपाध्याय मुनीश्री गुरुवर्य विशेष सागरजी महाराजांनी समाज बांधव व नागरिकांना उपदेश दिला की भक्त हा निस्वार्थी असावा भगवंतांच्या विचारांचे आचरण आणणारा असावा जिओ और जीने दो चा नारा अनुभवणारा असावा मारो और मरने दो असा वागणारा नसावा ऐसा धर्म पाळणारा असावा भगवान महावीर यांच्या विचारांचे आचरण करणारा असावा तेव्हाच भक्त गणला जातो असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत श्रमणश्री  विश्वदक्ष सागरजी ,विश्वतीर्ण सागरजी व्यास पिठावर उपस्थित होते. या स्वागत समयी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,राजेंद्र चौधरी,रेखा वानखेडे,अजय भारंबे,करुणा पाटील,लीना चौधरी, चारुदत्त वानखेडे,दिगंबर जैन समाज बांधव  उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकल जैन समाज बांधव  परिश्रम घेत आहे.

      आज बुधवार रोजी सकाळी साडेसात वाजता मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मूलनायक श्री चंद्र प्रभू भगवान यांचा पंचामृत मस्तकाभिषेक व विधान करण्यात आले .संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात भजनसंध्या ,आनंदयात्रा,गुरुभक्ती असे कार्यक्रम झाले.


गुरुवार सकाळी सात वाजता शोभायात्रा

दिनांक १० रोज गुरुवार सकाळी ७ वाजता भगवान महावीर चौक येथून शोभा यात्रे सुरुवात होऊन शोभायात्रा इंदिरा गांधी चौक ,छत्रपती संभाजी महाराज चौक ,चांदणी चौक ,गांधी चौक ,इंगळे वाळा ,गवत बाजार, माळीवाडा ,रविवार पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ,दादा गल्ली ,कॉर्नर रोड ,सुभाष चौक मोठा आड, मार्गे शोभायात्रा पाटील पुरा लहान मारोती येथून इंदिरा गांधी चौक मार्गे श्री चंद्रप्रभू व सहस्रकुट जिनालय जैन मंदिर येथे या शोभा यात्रेचा समारोप होईल.तरी शहरातील नागरिकांनी या शोभायात्रेचे स्वागत व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सकलजैन समाज ट्रस्टीतर्फे अध्यक्ष डॉ दीपक जैन,उपाध्यक्ष देवेंद्र अन्नदाते,सचिव विमलेश जैन,ट्रष्ट्री योगेश घोडके , अभिजीत मिटकर व दिगंबर जैन समाज तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.