सावदा शहर व परिसरातील अवैध धंदे तत्काल बंद करा अन्यथा १४ एप्रिल पासून आमरण उपोषण
सावदा शहर व परिसरातील अवैध धंदे तत्काल बंद करा अन्यथा १४ एप्रिल पासून आमरण उपोषण
लेवाजगत न्यूज सावदा -शहर व परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला असून शहरासह काही गाव व खेड्यांमध्ये अवैध धंद्यांने लोकांचे संसार उध्वस्त होत आहे. पत्ता,सट्टा जुगार,ऑनलाईन जुगार असे अवैध धंदे बोकाळले असून यामुळे संसार उध्वस्त होत आहे.
परिसर सह शहरातील अवैद्य व्यवसाय बंद करावे अशी मागणी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे राज्य महासचिव यांनी सावदा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
शहरातील व परिसरातील अवैद्य धंदे तत्काल बंद करावे अशी मागणी केली आहे. निवेदनात दिलेली मागणी मान्य न झाल्यास आपण सावदा येथे १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणास बसू असे सावदा पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आह. निवेदनावर रमाकांत तायडे यांची सही आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत