मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान,दाखल्यांची शाळा" उपक्रमास राज्यस्तरीय गौरव
मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान 2023-24 अंतर्गत "दाखल्यांची शाळा" उपक्रमास राज्यस्तरीय गौरव
लेवाजगत न्यूज जळगाव दि. 21 राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान 2023-24 अंतर्गत रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. येथील मंडळ अधिकारी श्री. जनार्दन दत्तात्रय बंगाळे यांना "दाखल्यांची शाळा" या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे पार पडलेल्या विशेष समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा तसेच राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती.
"दाखल्यांची शाळा" ही संकल्पना ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावेत यासाठी राबविण्यात आली. या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयांची प्रतिमा जनमानसात अधिक सकारात्मक झाली असून नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ग्रामीण भागात नवकल्पनांद्वारे परिवर्तन घडवणाऱ्या श्री. जनार्दन बंगाळे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून , त्यांचे कार्य इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत