वक्फ कायद्यातील सुधारणा अमान्य, देशभर आंदोलन उभारण्याचा निर्धार सावदा येथील सभेत सकल मुस्लिम समाजाचा सूर ज्येष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन
वक्फ कायद्यातील सुधारणा अमान्य, देशभर आंदोलन उभारण्याचा निर्धार
सावदा येथील सभेत सकल मुस्लिम समाजाचा सूर ज्येष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन
लेवाजगत न्यूज सावदा-सन १९९५ मध्ये वक्फ कायद्यात झालेली दुरुस्ती आम्हाला मान्य आहे. पण, आता २०२५मध्ये झालेली नवीन सुधारणा मान्य नाहीत. वक्फ मालमत्ता व वक्फ बोर्ड सांभाळण्यासाठी मुस्लिम सक्षम आहेत. नवीन वक्फ बिलाविरुद्ध आम्ही कायदेशीर मार्गाने सरकारविरुद्ध लढा देऊ. हे बिल रद्द करावे यासाठी लोकशाही मागनि देशभरात आंदोलने, धरणे, उपोषण करू असे मुफ्ती हारुण नदवी यांनी सांगितले.
येथील जेहरा मॅरेज हॉल येथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने वक्फ सुधारणा बिल 'उम्मीद २०२५'च्या विरोधात 'वक्फ कारवा' जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ रागीब जागीरदार जॉईंट सेक्रेटरी जळगाव, ऐजाज मलिक सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शरद पवार, सोहेल अमीर जमाते इस्लामी जळगाव, मुक्ती हरून नदवी नायब सदर जमियातून उलमा, डॉ अब्दुल करीम सालार सेक्रेटरी मजलीस मुशावरत महाराष्ट्र राज्य, सय्यद आयाज अली, रमाकांत तायडे भीम आर्मी माजी प्रवक्ता महाराष्ट्र राज्य, मौलाना खालील साहब यावल, कोमी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष शेख कुर्बान, उपाध्यक्ष शेख इरफान, सेक्रेटरी सय्यद असगर, इरफान मेंबर चिनावल, रफिक शेठ ऐनपुर, फिरोज खान हबीबुल्ला खान, जफार मेंबर फैजपूर,असलम खान,अजमल खान,तौफिक खान बामनोद, अब्दुल रऊफ जनाब फैजपूर,गुड्डू मेंबर, आदीसह रावेर-यावल तालुक्यातील समाजसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
फारुख शेख यांनी वक्फ बिल २०२५ हे कायद्याच्या दृष्टीने कसे असंवैधानिक आहे, ही माहिती दिली. करीम सालार यांनी वक्फ कायदा सुधारणा बिलामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आली आहे. त्यामुळे हा कायदा आम्हाला मान्य नाही अशी भूमिका घेतली. मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत