फैजपूर येथील सावदा रोडवरील डेरेदार वृक्षतोडी मागे कोणाचा हात चौकशी होऊन कार्यवाही व्हावी वृक्ष प्रेमींची मागणी
फैजपूर-सावदा रोडवर डेरेदार वृक्षाची कत्तल
डेरेदार वृक्षाला जीर्ण वृक्ष म्हणणारे अधिकाऱ्यांवर करा कारवाई
लेवाजगत न्यूज फैजपूर-फैजपूर -सावदा रोडवरील हिरो शोरूम समोरील डेरेदार भल्या मोठ्या निंबाचे हिरवीगार झाड अज्ञात व्यक्तीने तोडली आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून हे झाड या ठिकाणी उभे होते. सध्या उन्हाळा जोरात सुरू आहे, रस्त्यावर उभे राहण्यासाठी झाडाची सावली घ्यावी लागते. मात्र, हिरो शोरूम समोरील डेरेदार निंबाचे झाड भर दिवसा ट्रॅक्टर मध्ये भरून काटुन व्यक्तीने तोडून नेले.काही पुन्हा लाकडे या ठिकाणी आणून ठेवले.
नॅशनल हायवे एथॉरिटीच्या नियंत्रणात असलेल्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर फैजपूर शहराजवळ सावदा रोडवर हा भला मोठा रुक्ष दिमाखात उभा होता. या वृक्षाची कशालाच अडथळा नव्हता. हायवे ऑथोरिटीच्या इंजिनियरने त्यांच्या जागेतील या वृक्षास परवानगी दिली का? तसेच हे वृक्ष तोडण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगी मध्ये यावल वनविभागाने खाजगी जागेतील जीर्ण वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. अधिकारी यांनी डोळे झाकून परवानगी दिली आहे का, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी वृक्षप्रेमी करीत आहे.
या व्यक्तीला झाड तोडण्याची परवानगी कशी देण्यात आली. याने कोणाच्या सांगण्यावरून झाड तोडली याची चौकशी करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून करण्यात आली आहे. झाडे लावून जगवणे सर्वात कठीण आहे. हिरवीगार झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने लक्ष देऊन वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
हायवे वरील भले मोठे हे झाड तोडण्याची परवानगी देण्यामागील उद्देश्य काय ? डेरेदार वृक्ष तोडण्याची परवानगी का दिली याचीही चौकशी व्हावी नॅशनल हायवे वरील झाड खाजगी दाखवून तोडण्यात आले. वन विभागानेही हे वृक्ष कोणाच्या जागेत आहे हे न बघता जीर्ण म्हणून डेरेदार वृक्ष तोडण्याची परवानगी कशी दिली याचीही चौकशी आमदार,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व मंत्र्यांनी करावी असे रुक्ष प्रेमी करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत