Header Ads

Header ADS

शेतकऱ्याने मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्यांच्या हल्ल्या पासून बचावला,डोंगर कठोरा मोहाडी परिसरात घबराहट

 

Farmer-saved-from-leopard-attack-by-loud-shouting-; Panic in Dongar Kathora Mohadi area


शेतकऱ्याने मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्यांच्या हल्ल्या पासून  बचावला,डोंगर कठोरा मोहाडी परिसरात घबराहट


लेवाजगत न्यूज यावल-तालुक्यातील डोंगर कठोरा मोहाळी शिवारातील एका शेतात शेतकऱ्याला थेट त्याच्या समोर मादी व तिचे पिलू असणाऱ्या दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

   याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील डोंगर कठोरा येथील मोहाळी शिवारातील शेतकरी मनोहर बळीराम पाटील यांच्या शेतात सदर शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या केळीच्या बागेला पाणी भरत असतांना त्यांना कोणत्यातरी प्राण्याने एका बोकडाला लागलीच खाल्ले असल्याचे लक्षात आले. परिणामी ते घाबरलेल्या अवस्थेमध्ये हळूहळू मागे सरकत असतांना लागलीच त्यांच्या पुढ्यात एक बिबट्याचे लहान पिल्लू त्यांच्या पायावर पडले. त्यांच्या पायावर बिबट्याचा पाय पडल्यामुळे ते खाली पडले व मोठमोठ्याने आरडाओरड करू लागले. त्याचवेळी त्यांच्यापुढे आणखी दुसरा बिबट्या (म्हणजेच त्या लहान बिबट्याची माता) मादी बिबट्या येऊन उभा राहिला. अशावेळी आता आपला जीव हे बिबटे नक्की घेणार या धारणेतून गर्भगळीत झालेले मनोहर पाटील यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करीत पडलेल्या अवस्थेत त्या बिबट्यांच्या दिशेने केवळ माती फेकत बसले. यात त्यांचे दैव बलत्तर म्हणून त्यांच्या ओरडण्याने त्यांची पत्नी व परिसरातील शेतकरी वेळीच धावून आल्याने सदरील दोन्ही लहान-मोठे बिबटे हे जंगलात पळून गेले. यामुळे मनोहर पाटील यांचा जीव वाचला. तर या घटनेमुळे परिसरात कमालीचे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


    दरम्यान सदर घटनेबाबत वन विभागाला कळविण्यात आले असून वन विभागाच्या वतीने पिंजरा ठेऊन तसेच कॅमेरे लावून संबंधित बिबट्यांवर निगराणी ठेवली जात आहे अशी माहिती पूर्व विभाग वनक्षेत्रपाल स्वनिल फटांगरे यांनी दिली आहे.सदरहू सदर घटना ही दिनांक २४ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमाराला घडली असून बिबट्यांनी पडशा पडलेला बोकड हा डोंगरदा येथील मेंढपाळ ठाकूर पावरा यांचा असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. तरी वन विभागाने या दोन्ही बिबट्यांना पकडून शेतकऱ्यांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.