गोळीबार- प्रेमविवाह केल्याचा रागातून सेवानिवृत्त CRPF अधिकाऱ्याचा मुलगी व जावई यांचेवर गोळीबार ,मुलगी ठार जावई गंभीर जखमी !
प्रेमविवाह केल्याचा रागातून सेवानिवृत्त CRPF अधिकाऱ्याचा मुलगी व जावई यांचेवर गोळीबार ,मुलगी ठार जावई गंभीर जखमी !
लेवाजगत न्यूज चोपडा- प्रेम विवाहाच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेली मुलगी व जावई यांचेवर गोळीबार केला असून यात त्याची मुलगी ठार झाली आहे.तर जावई गंभीर जखमी झाल्याने परिसर हादरला आहे.
प्रेम प्रकरणा रागातुन सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने हळदीच्या कार्यक्रमात आलेली मुलगी व तिचा पती यांच्यावर गोळीबार केला आहे. यात मुलगी तृप्ती अविनाश वाघ (वय २४) हिचा मृत्यू झाला असून तिचा पती अविनाश ईश्वर वाघ (वय २८, दोघे रा करवंद, शिरपूर, ह मु कोथरूड पुणे) याला पोटात गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना शहरातील आंबेडकर नगर (खाई वाडा जवळ) येथे रात्री १० वाजेला घडली. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे
दोन वर्षांपूर्वी अविनाश व तृप्ती यांचा प्रेम विवाह झाला होता. यातच अविनाश याच्या बहिणीची हळद दिनांक २६ रोजी चोपडा शहरातील खाई वाडा जवळील आंबेडकर नगर येथे होती. त्यानिमित्ताने ते चोपडा येथे आले होते. त्यात तृप्तीने प्रेम विवाह केला याचा राग वडील निवृत्त सीआरपीएफ किरण अर्जुन मंगले यांच्या मनात होता. (वय ४८,रा शिरपूर जि धुळे) ते चोपडा येथे हळदीच्या ठिकाणी आले. त्यात त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर व तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.
सदरच्या घटनेमुळे उपस्थित वऱ्हाडीना राग येऊन गोळीबार करणाऱ्या किरण मंगले याला पब्लिक मार दिला यात तो गंभीर जखमी झाला आहे. पुढील उपचारासाठी जावाई अविनाश व सासरा किरण मंगले यांना जळगाव हलविण्यात आले आहे. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत