नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आलीबाग येथे "आमरण उपोषण"
नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आलीबाग येथे "आमरण उपोषण"
लेवाजगत न्यूज उरण:सुनिल ठाकूर - गेले १५ ते २० वर्षांपासून नगरपरिषदेमध्ये कंत्राटी सफाई कामगार अतीशय प्रामाणिक पण शहराची घाण साफ करत आहेत.
स्वतःचा जीव धोक्यात टाकून नगर वासियांचे आरोग्य जपण्याचे अनमोल काम करत आहेत.
विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या वेळी हा कामगार जर कार्यरत नसता तर नागरीकांना जगणे अशक्य झाले असते. तेव्हा हा कामगार स्वच्छता दूत होता. देशभर ताट , चमचे घेऊन घंटा नाद करून याच कामगारांना कोरोना योद्धा म्हणून संबोधले जात होते.
आज याच कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेले किमान वेतन , भविष्य निर्वाह निधी, ESIC या आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नाही.
या कामगारांचे शोषण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कराराचे उलंघन केले असेल तर मुख्याधिकारी यांनी संबंधित कंपनीवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
जर ही कारवाई मुख्याधिकारी यांनी केली नाही तर या मुख्याधिकार्यांवर मा. आयुक्त तथा संचालक यांचे दि. २६ ऑगस्ट २०२४ च्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने या मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करणेबाबतचे लेखी आदेश दिलेले आहे.
जो पर्यंत संबंधित अधिकार्यांवर कारवाई करा आणि कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार आहे.
या लढ्याचे कामगार नेते अनिल जाधव, संतोष पवार यांनी माहीती दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत