पहलगाममध्ये गोळीबाराचे आवाज, बुलढाण्याच्या कुटुंबाला पहलगामच्या हॉटेल मालकाने वाचवलं
पहलगाममध्ये गोळीबाराचे आवाज, बुलढाण्याच्या कुटुंबाला पहलगामच्या हॉटेल मालकाने वाचवलं
लेवाजगत न्युज पहलगाम:-जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 25 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. सुदैवाने बुलढाणा जिल्ह्यातील पाच जणांचा जीव या दुर्घटनेतून बचावला आहे. अचानक फायरिंग सुरू झाल्याने हॉटेल मालकाने त्यांना बाहेर जाण्यापासून थांबवलं आणि संपूर्ण कुटुंब बचावलं.
निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन अशी बचावलेल्या कुटुंबीयांची नावं आहेत. 18 तारखेला हे कुटुंब मुंबईहून काश्मीरला निघाले होते. जम्मू काश्मीरमधील सर्व ठिकाणी फिरुन झाल्यानंतर 21 तारखेला रात्री पहलगाममध्ये हॉटेलला आले. 22 ला सकाळी पहलगाममध्ये फिरायला निघणार, तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे व बाहेर न पडण्यास सांगितले. आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. जेव्हा फायरिंग होत होती तेव्हा बुलढाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते. फायरिंगच्या आवाजाने परिवार खूप घाबरला होता.
या भ्याड हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सन 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा हा काश्मीर खोऱ्यातील सर्वांत घातक हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत