Header Ads

Header ADS

महिलेचा विवस्त्र व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल; एका विरुद्ध गुन्हा दाखल

 

Woman's nude video goes viral on social media, case registered against one


महिलेचा विवस्त्र व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल; एका विरुद्ध गुन्हा दाखल


लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर-मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एका धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि दबाव टाकून तिचा विवस्त्र व्हिडिओ बनवून तो समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्या कृष्णा चिखलकर उर्फ कोळी (रा. हरताळा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील पीडित महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी कृष्णा चिखलकर याने तिला भुरळ पाडून आणि दबावतंत्राचा वापर करून प्रेमसंबंधात ओढले. त्यानंतर त्याने तिला पूर्ण विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यावरही आरोपीने तिला मानसिक त्रास दिला.


आरोपीने व्हिडिओ कॉलवर महिलेचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तिची कोणतीही परवानगी न घेता तो समाज माध्यमांवर प्रसारित केला. या कृत्यामुळे महिलेच्या स्त्री मनाला लज्जा आणि मानसिक त्रास सहन करावा लागला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, आरोपी कृष्णा चिखलकर उर्फ कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.