पाल-खिरोदा मार्गावर बोरघाटात भीषण अपघातात पिता-पुत्र ठार, आई-मुलगा गंभीर जखमी
पाल-खिरोदा मार्गावर बोरघाटात भीषण अपघातात पिता-पुत्र ठार, आई-मुलगा गंभीर जखमी
लेवाजगत न्यूज सावदा:- रावेर तालुक्यातील पाल- खिरोदा बोरघाटात दिनांक २७ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात चार चाकी मालगाडी एम एच २८ – १३१४ क्रमांकाचे वाहनाने एका एम पी ०९ एक्स ७७७९ क्रमांकाच्या मोटार सायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यात पिता-पुत्र ठार झाले असून पत्नी व पुत्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंट्या मोहन भिलाला. वय ३५ वर्ष व दितीक पिंट्या भीलाला वय ४ वर्ष दोघे रा. पाल तालुका रावेर हे दोघे या अपघातात ठार झाले. तर पत्नी पूजा पिंट्या भिलाला वय ३० वर्षे व रोशन पिंट्या भीलाला वय २ वर्ष रा. पाल हे दोघे डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. तर चारचाकी वाहन चालक फरार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत