Header Ads

Header ADS

गरीब कुटुंबातील योगेशची यूपीएससी परीक्षेत भरारी यावल तालुक्यातील आमोदा येथील तरुणाचे यश

 गरीब कुटुंबातील योगेशची यूपीएससी परीक्षेत भरारी यावल तालुक्यातील आमोदा येथील तरुणाचे यश

गरीब कुटुंबातील योगेशची यूपीएससी परीक्षेत भरारी यावल तालुक्यातील आमोदा येथील तरुणाचे यश



 लेवाजगत न्यूज सावदा : घरची परिस्थिती बेताची. वडिलांचे छोटेसे किराणा दुकान मात्र काही तरी करून दाखवायची जिद्द असल्याने आमोदा ता. यावल या छोट्याशा खेड्यातील योगेश ललित पाटील (२६) या तरुणाने यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले. द्वितीय प्रयत्नात ८११ रँकसह तो उत्तीर्ण झाला आहे. योगेश याच्या या यशाने परिवारासह आमोदा गावातसुद्धा आनंद व्यक्त होत आहे. योगेशच्या वडिलांचे दहावीपर्यंतच शिक्षण झाले आहे. आमोदा येथे छोटेसे किराणा दुकान व सोबतीला थोडी शेती आहे. अशा साधारण कुटुंबात जन्मलेल्या योगेश याचे प्राथमिक शिक्षण अंबरनाथ (ठाणे) येथे आत्याकडे झाले. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण अंबरनाथ येथे झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण ठाणे येथे घेतले, तर त्याचे अभियांत्रिकीचे बीटेकपर्यंतचे शिक्षण नागपूरच्या एनआयटीमधून झाले. त्यानंतर दिल्ली येथे एमएचे शिक्षण घेत असतानाच यूपीएससीची तयारी सुद्धा सुरू केली.


दुसऱ्या प्रयत्नात यश


२०२० ते २०२४ पर्यंत आमोदा, ता. यावल येथे घरीच अभ्यास करून यूपीएससीची परीक्षा दिल्यावर पहिल्या प्रयत्नाने योगेश याला यशाने हुलकावणी दिली. मात्र, अपयशाने खचून न जाता त्याने सातत्य ठेवून दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली व आपले ध्येय साध्य करत ८११ व्या रँकने यश संपादन केले.


केवळ अभ्यास आणि अभ्यास


योगेशने सांगितले की, रोज आठ ते दहा तास अभ्यासात सातत्य व एकाग्रता ठेवल्यास यश तुमचेच आहे. अभ्यास आणि केवळ अभ्यास... असा सल्ला त्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना दिला आहे. मोठे यश मिळविताना शॉर्टकट नसतो, असेही त्याने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.