तरुण युवक विकी उर्फ विनायक पवार यांची राहत्या घरात आत्महत्या
तरुण युवक विकी उर्फ विनायक पवार यांची राहत्या घरात आत्महत्या
लेवा जगत न्यूज सावदा:- येथील मस्कावद रोड परिसरातील भोईवाडा भागातील रहिवासी विनायक उर्फ विकी मोनज पवार (वय २१ वर्ष) यांनी आज शुक्रवार दुपारी राहत्या घरात आत्महत्या केली.पोलिसात गुन्हा नोंदण्याची कारवाही सुरू आहे.
भोईवाडा परिसरातील विकी पवार हा आपली आई, विवाहित बहीण, एक लहान भाऊ या परिवारासह राहत होता .त्याचे फैजपूर रोडवर पवार एक्वा नावाचे शॉप आहे. आज शुक्रवार दुपारी त्याने राहत्या घराच्या छताच्या कडीला दोरी लावून गळफास घेतला त्यात त्याचे निधन झाले. घटनेची माहिती सावदा पोलीस ठाण्याला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील,सहाय्यक फौजदार संजय देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी केली व गुन्हा नोंदणीचे काम सुरू आहे.घरातील आधार असलेला युवक गेल्याने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ते होतकरू यशस्वी उद्योजक तर सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत