Header Ads

Header ADS

सावदा येथे १ दिवसाचे अर्भक आढळल्याने खळबळ ! गुन्हा दाखल

 सावदा येथे १ दिवसाचे अर्भक आढळल्याने खळबळ !गुन्हा दाखल 

Excitement as 1-day-old baby found in Savda


लेवाजगत न्यूज सावदा:- येथील रविवार पेठ परिसरात असलेल्या नगीना मज्जीद जवळ असलेल्या लोखंडी पोल जवळ आज गुरुवार रोजी  सकाळी ९ वाजेच्या दरम्यान एका अंदाजे एक  दिवसाचे अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. निष्पाप बालक अशा अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

     घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिसराची पाहणी केली असून, सीसी टीव्ही पुटेज पाहणी करीत आहे की, हे अर्भक येथे कसे आले आणि त्याचे पालक कोण आहेत, याचा कसून तपास सुरू केला आहे. 

    या गंभीर घटनेसंदर्भात शेख रहीम शेख मंजूर यांचे फिर्यादी वरून आज गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि  विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय देवरे करीत आहे.


   एका निष्पाप बालकाला अशा प्रकारे सोडून दिल्याच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून सत्य समोर आणतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.