Header Ads

Header ADS

एनडीए परीक्षेत ऋतुजा वऱ्हाडेची ऐतिहासिक कामगिरी; मुलींमध्ये देशात पहिले स्थान

 

ही यशोगाथा कथन केली राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) प्रवेश परीक्षेत देशात मुलींमध्ये पहिली आणि सर्व विद्यार्थ्यांत तिसरा क्रमांक पटकावण्याचा मान मिळवणाऱ्या पुण्यातील ऋतुजा वऱ्हाडे हिने. या कामगिरीबद्दल बोलताना ऋतुजा म्हणाली, 'माझे वडील संदीप वऱ्हाडे यांना सैन्यात भरती होऊन अधिकारी होण्याची खूप इच्छा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही.' तथापि, त्यांनी मला शाळेपासूनच सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. जेव्हा मुलींसाठी एनडीएमध्ये सामील होण्याचे दरवाजे उघडले तेव्हा त्यांनी मला सैन्यात भरती होण्यासाठी एनडीएचा मार्ग निवडण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मी सैन्यात भरती होण्याबाबत माहिती गोळा केली आणि दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी एनडीएमध्ये गेलो तेव्हा मला येथील कॅम्पस आवडला होता. तेव्हाच मी प्रशिक्षणासाठी येथे येण्याचा निर्णय घेतला. ऋतुजा म्हणाली, तिला शालेय जीवनापासूनच लष्करी सेवेची आवड होती. पालकांसोबत विविध लष्करी स्पर्धांमध्ये भाग घेत असतानाच तिने आयुष्यात उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी तयारी करून, तिने देशातील कठीण परीक्षा मानली जाणारी एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली. संवाद कौशल्य वाढवणे, वेगवेगळ्या प्रकारे लेखन शैली विकसित करणे, सामान्य ज्ञान वाढवणे आदी गोष्टीवर परिश्रम घेतल्याने



एनडीए परीक्षेत ऋतुजा वऱ्हाडेची ऐतिहासिक कामगिरी; मुलींमध्ये देशात पहिले स्थान


लेवाजगत न्यूज पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश परीक्षेत पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे या विद्यार्थिनीने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. हा विक्रम गाठण्यासाठी ऋतुजाने अत्यंत कठोर शारीरिक तयारी केली. एनडीए परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तिने ३० किलो वजन कमी केले होते.


ऋतुजाने लहानपणापासूनच देशाच्या संरक्षण दलात काम करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी तिने पुण्यातील यशोतेज अकादमी (Yashotej Academy) मध्ये प्रशिक्षण घेतले. तिच्या यशाने पुण्याच्या माना वाढल्या आहेत, त्याच वेळी तिने संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे.


"एनडीए प्रवेश परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर मी खूप आनंदित आहे," अशी प्रतिक्रिया ऋतुजाने व्यक्त केली. "माझ्या यशात माझे कुटुंबीय आणि मार्गदर्शकांचाही मोठा वाटा आहे. आता मी एनडीएमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून लष्करात पायलट होण्याचा माझा मोठा स्वप्न आहे," अशा शब्दांत तिने तिच्या आगामी योजना सांगितल्या.


बारामती लोकसभा मतदार संघातील नऱ्हे, पुणे येथील रहिवासी असलेल्या ऋतुजा वऱ्हाडेच्या या यशामुळे तिला देशभरातून शुभेच्छा मिळत आहेत. "ऋतुजाचे हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. ती एनडीएच्या माध्यमातून देशाच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे, ही एक प्रेरणादायी बाब आहे," असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.



राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ७५ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की मुलींना परीक्षा देण्याची संधी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २०२१ पासून मुलींना एनडीए परीक्षेत सहभागी होता येणारी संधी मिळू लागली आहे. ऋतुजाचे यश हे केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, संरक्षण क्षेत्रातील लिंग समावेशकतेकडे घेतले गेलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


प्रेरणास्रोत बनलेली ऋतुजा


ऋतुजाचे यश देशभरातील तरुण मुलींसाठी एक प्रेरणास्रोत ठरेल. तिच्या यशामुळे असंख्य मुलींना भारतीय संरक्षण दलात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल. त्याच वेळी तिची कहाणी शिकवणारी आहे की अटळ निर्धार आणि कठोर मेहनत कोणतीही अडथळे ओलांडण्यासाठी पुरेशी आहेत.



संरक्षण विभागाची हेलिकॉप्टर आणि विमाने उडताना पाहून माझ्याही मनात अशीच भरारी घेण्याचा विचार आला. माझ्या आईवडिलांचेही हे स्वप्न होते. माझे वडील संदीप वऱ्हाडेंना सैन्यात भरती होऊन अधिकारी होण्याची खूप इच्छा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. ते शिक्षण क्षेत्रात गेले. पण मी त्यांची इच्छा पूर्ण केली.' आज लष्करात जाऊन अधिकारी होण्याचे वडीलांचे स्वप्न सत्यता उतरवू शकले याचा आनंद आहे. मला शिकवण्याची आणि हार्मोनियम वादनाची आवड असल्याचे तिने सांगितले. ऋतुजाचे वडील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि आई प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे.ऋतुजा संदीप वऱ्हाडे ही प्रा. संदीप वऱ्हाडे, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, पुणे यांची मुलगी आणि प्रा. नितीन खर्चे पद्मश्री. डॉ. वि. भि. कोलते   कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, मलकापूर यांची भाची आहे.


८.५ लाख विद्यार्थ्यांची परीक्षेला हजेरी, ८ हजार उमेदवार लेखी परीक्षेस पात्र

एनडीए आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) प्रवेशाची परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेते. या परीक्षेत विद्यार्थ्यांची अंतिम यादी लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे निवडली जाते. ही परीक्षा ९०० गुणांची आहे. या वर्षी देशभरातून ८.५ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात सुमारे दीड लाख मुलींचे अर्ज होते. एकूण परीक्षार्थीमधून आठ हजार उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच दिवसांची एसएसबी मुलाखत द्यावी लागते. यात मानसिक तयारी, नेतृत्वगुण, वक्तृत्व, टीमवर्क, आत्मविश्वास, सांघिक भावना आदी गोष्टींची तपासणी होते. ज्या विद्यार्थ्यांत अधिकारी बनण्याचे नेतृत्वगुण आहेत अशा ४०६ जणांची अंतिम निवड करण्यात आली आहे.






८६ किलो वजन होते, ३० किलो कमी केले: यामध्ये २७ जागा मुलींसाठी यंदा भरण्यात आल्या असून त्यात ऋतुजा हिचा क्रमांक पहिला असल्याचे तिचे प्रशिक्षक तेजस पाटील यांनी सांगितले. लेखी परीक्षेत ऋतुजा चांगली होती, परंतु एसएसबीसाठी तिने विशेष कष्ट घेतले. तिने आपले वजन ८६ किलोवरून ५६ किलोपर्यंत कमी म्हणजे तब्बल ३० किलो घटवले. पूर्वी ती फारशी बोलत नव्हती, परंतु तिने स्वतःत बदल घडवला. आता ती सर्वांसमक्ष भाषण करू शकते. तिच्यात नेतृत्वगुण विकसित केले, असेही पाटील यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.