किसान सहकारी दुग्ध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीत २४ नामनिर्देशन पत्र दाखल
किसान सहकारी दुग्ध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीत २४ नामनिर्देशन पत्र दाखल
लेवा जगत न्यूज सावदा- येथील गांधी चौक परिसरातील असलेल्या किसान सहकारी दूध उत्पादक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून आज दिनांक दहा रोजी शेवटच्या दिवसापर्यंत २४ नामनिर्देशन पत्र सभासदांनी दाखल केले आहे.
येथील ४०९ च्या वर सभासद संख्या असलेल्या किसान सहकारी दूध उत्पादक संस्थेचे पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आज शेवटच्या दिवशी पर्यंत २४ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. दिनांक १३ रोजी छाननी असून मतदानाची तारीख ७ जून तर निकालही त्याच दिवशी संध्याकाळी जाहीर करण्यात येईल. १७ जागेसाठी होत असलेल्या या निवडणूकित, जनरल १२ जागेसाठी अर्चना अतुल नेमाडे,अतुल रामदास नेमाडे, दिलीप त्रंबक येवले, घनश्याम ओंकार भंगाळे, निलेश दिनकर अच्युत ,रमेश तोताराम येवले, लतेश रवींद्र चौधरी,रमेश दुला इंगळे, महेश दिनकर चौधरी,विनोद प्रभाकर जावळे,भोजराज मधुकर चौधरी, भूषण प्रमोद चौधरी,मोहन श्रावण राणे, सुलभा रमेश इंगळे,चैतन्य खुशाल नेमाडे, गोपाळ दोधु भंगाळे,अक्षय सुभाष सरोदे,घनश्याम रामदास पाटील व स्वप्निल सुनील पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत तर महिला राखीव गटातून दोन जागेसाठी नीलमा चंद्रकांत चौधरी व नीलिमा संदीप राणे तर इतर मागासवर्ग मतदार संघातून राजेंद्र श्रीकांत चौधरी व अक्षय सुभाष सरोदे,भटक्या विमुक्त जमाती या गटातून धर्मदास नारायण बैरागी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून असे एकूण २४ अर्ज आज तीन वाजेपर्यंत दाखल करण्यात आले आहे.
या दुग्ध उत्पादन संस्थेची निवडणूक बिनविरोध होते का मतदान होते याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत