सावदा सहकारी दूध उत्पादक संस्था निवडणुकीत १९ सभासदांनी दाखल केले अर्ज
सावदा सहकारी दूध उत्पादक संस्था निवडणुकीत १९ सभासदांनी दाखल केले अर्ज
लेवाजगत न्यूज सावदा-येथील दुर्गामाता मंदिर परिसरातील सावदा सहकारी दूध उत्पादक संस्थेचे पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून दिनांक नऊ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेला १९ सभासदांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. आज छाननीच्या दिवशी संस्थेच्या कार्यालयात बारा वाजेपर्यंत कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते.
अकराशेच्या वर सभासद असलेल्या सावदा सहकारी दूध उत्पादक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक दिनांक दोन रोजी जाहीर करण्यात आली. दिनांक ९ मे रोजी नामनिर्देशन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवस पर्यंत एकोणवीस सभासदांनी आपले नामनिर्देशन पत्र भरले तर एक सभासदांनी तीन वाजून पाच मिनिटांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. पंधरा जागांसाठी होत असलेली ही निवडणूक चुरशीची वाटत असली तरी बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. महिला राखीव गटातून दोन अर्ज दाखल असून भटक्या विमुक्त जमाती गटासाठी साठी एक अर्ज व इतर मागासवर्गातून एक अर्ज असे महिला राखीव गटातून दोन जागांसाठी दोन अर्ज व इतर मागासवर्ग व भटक्या विभक्त एका जागेसाठी एक एक अर्ज आला आहे.तर जनरल बारा जागा करिता १६ नामनिर्देशन पत्र आले आहेत.माघारीच्या दिवसापर्यंत कोण अर्ज मागे घेतो यावर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. जर मतदान झाले तर ही निवडणूक या ८ जून तारखेला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात होईल व त्याच दिवशी निकाल जाहीर होईल.
भरत प्रल्हाद नेमाडे,रवींद्र बळीराम नेमाडे,मुरलीधर सुदाम राणे,परीक्षित शरद वाणी,राहुल नोमदास वाणी,राकेश मुरलीधर बढे,कुशल सुरेंद्र जावळे,विजय प्रकाश वाघुळदे,बिपीन शरद वाणी,रवींद्र श्रावण बेंडाळे,धनंजय वासुदेव चौधरी,जगदीश लहू बढे,संजय रामचंद्र चौधरी,किरण जनार्दन पाटील व तुषार बाळू बेंडाळे यांनी जनरल गटातून नामनिर्देशन तर महिला राखीव जोसना नरेंद्र बोनडे,सुलभा यशवन्त चौधरी,विमुक्त भटक्या जमाती हेमराज मंसाराम जोगी,इतर मागास प्रवर्ग देवानंद नामदेव बढे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज छाननीच्या दिवशी संस्थेच्या सभागृहास साडेबारा वाजेपर्यंत कुलूप होते व छाननीची वेळ अकरा छाननी संपे पर्यंत होती. पण या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवारी दाखल करणारे सभासद नव्हते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत