अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थी त्रस्त, व्हिसाच्या मुलाखती थांबवल्या
अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थी त्रस्त, व्हिसाच्या मुलाखती थांबवल्या
लेवाजगत न्युज मुंबई:-
अमेरिकेने व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या मुलाखती तात्पुरत्या थांबवण्याची घोषणा केल्याने हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात सापडले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलले असून, सर्व व्हिसा अर्जदारांची सोशल मीडियावरील माहिती अधिक काटेकोरपणे तपासली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
Us student visa: भारतातून दर वर्षी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अमेरिकेत दाखल होता. वर्ष २०२३-२४मध्ये २.६८ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत प्रवेश घेतला होता. हे प्रमाण यंदा वाढण्याची शक्यता होती. मात्र, व्हिसाच्या मुलाखती थांबवल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
Us stops student visa interviews: नेमके काय झाले?
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी जगभरातील सर्व अमेरिकन दूतावासांना विद्यार्थ्यांच्या व्हिसा मुलाखती तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. 'अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व अर्जदारांच्या सोशल मीडिया खात्यांची सखोल तपासणी करावी. त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्यात येणार आहेत,' असे त्यांनी आदेशात नमूद केले. या निर्णयामुळे जगभरातून अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत