Header Ads

Header ADS

देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद करुनही... वारंवार खंडित होणाऱ्या विद्यूत पुरवठ्यामुळे उरण पूर्व विभागातील नागरिक हैराण..

 

Citizens of Uran East division are in distress due to frequent power outages despite power supply being shut off for-maintenance-and-repairs.


देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद करुनही... वारंवार खंडित होणाऱ्या विद्यूत पुरवठ्यामुळे उरण पूर्व विभागातील नागरिक हैराण..


लेवाजगत न्यूज उरण सुनिल ठाकूर-उरण तालुक्यातील पूर्व विभागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने उरण परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करूनही वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने उरण परिसरातील नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.


Farmers who had made arrangements for the purchase of government jowar did not receive payment



   उरण परिसरातील पूर्व विभागात वारंवार विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळतं आहे. विद्युत पुरवठा खंडित का झाला? अशी  विचारणा नागरिकांनी केल्यावर  महावितरणाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून  नागरिकांना उत्तर मिळत नाहीत. त्याचप्रमाणे महावितरणाचे  कर्मचारी एक तर फोन बंद करून बसत आहेत. आणि जरी संपर्क झाला तरी फोन देखील उचलायची तसदी घेत नाही आहेत अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

उरण शहर व परिसरात विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार दररोजचे आहेत.गेल्या तीन दिवसांपासून उरण तालुक्यातील सारडे, वशेणी पुनाडे ही गावे अंधारात आहेत.

  कोणतेही कारण न देता उरण पूर्व विभाग व इतर विविध भागात वीजप्रवाह  खंडित करण्याचे प्रकार महावितरणा वारंवार कडून होत आहेत, आठवड्यातुन मंगळवारी किंवा कधी कधी शुक्रवारी एकदा देखभाल दुरुस्तीसाठी  वीजपुरवठा खंडित केला जात असताना, इतर दिवशींही दिवस, रात्र,सकाळ संध्याकाळ कधीही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने, नागरिकातून महाविरणाला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. उरण परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी गोडाऊन आहेत त्याचप्रमाणे विविध कंपन्या देखील आहेत .नागरिकांची वीज जरी गेली तरी या कंपन्यांची वीज मात्र जशीच्या तशी असते. सर्वसामान्य नागरिकांची आबाळ करून विजेचा लोड, खाजगी गोडाऊनला देण्यात येत असल्याने त्याचा परिणाम उरण परिसरातील विजेवर होत आहे. असा आरोप नागरिक महावितरणावर करत आहेत.

महावितरणात तक्रार दाखल करूनही फारसा फरक न पडल्याने नागरिक भरडले जात आहेत. 


प्रतिक्रिया -शारदा म्हात्रे (उरण)दिवस-रात्र सकाळ संध्याकाळ कधीही वीज जात असल्यामुळे त्याचा परिणाम आमच्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. शाळेत जाणारी मुले असून त्यांच्या अभ्यासावर देखील या वीज समस्येचा परिणाम होत आहेत याप्रकरणी महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क साधला असता त्यांच्याकडून मात्र फोन उचलले जात नाही आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.