दिव्यांगांसाठी तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रात ३० जूनपर्यंत अर्ज पाठवावेत
दिव्यांगांसाठी तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रात ३० जूनपर्यंत अर्ज पाठवावेत
लेवाजगत न्यूज जळगांव- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर या संस्थेमार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रशिक्षणार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ ते ४० वयोगटातील दिव्यांग, मूकबधिर आणि मतिमंद मुला-मुलींना विविध कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाणार आहे.
या प्रशिक्षण केंद्रात शिवणकाम, संगणक अकाउंटिंग, ऑफिस ऑटोमेशन, बेल्डर कम फॅब्रिकेटर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुविधा आहे.
इच्छुक विद्यार्थी किंवा त्यांचे पालकांनी ३० जून २०२५ पर्यंत तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर, जि. नांदेड येथे पत्रव्यवहाराद्वारे किंवा समक्ष संपर्क साधून अर्ज सादर करावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.
*शाळेचा पत्ता: भायेगाव रोड, देगलूर, ता. देगलूर, जि. नांदेड, मो. नं- 99609000369, 9403207100,7378641136*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत