सावदा रेल्वे तर्फे झालेल्या चित्रकला स्पर्धेत रुपल तायडे प्रथम
सावदा रेल्वे तर्फे झालेल्या चित्रकला स्पर्धेत रुपल तायडे प्रथम
लेवा जगत न्यूज सावदा-सावदा रेल्वे स्टेशनवर अमृत भारत योजनेअंतर्गत यात्री सुविधांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा पार पडला या कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला ड्रॉईंग व निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते प्रथम व द्वितीय विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद व भुसावळ विभागाच्या रेल्वे डीआर एम इती पांडे पार पडला . स्पर्धेमध्ये भारतीय सिंदूर ऑपरेशन मिशन सक्सेस कामयाब झाले. त्या अनुषंगाने रेल्वेच्या अमृत भारत योजना अंतर्गत झालेल्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त चित्रकला(ड्रॉईंग ),निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल व समर्थ अकॅडमी मध्ये शिक्षण घेत असलेली सामाजिक कार्यकर्ते संतोष तायडे यांची मुलगी रुपल हिचा चित्रकला ड्रॉइंग मध्ये पहिला क्रमांक आला .
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रेल्वेचे कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सावदा रेल्वे स्टेशन येथे उपस्थित होते रूपला मिळालेल्या या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसामुळे तिचे सावदा सह परिसरात नागरिकांना व आप्तेष्टांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत