Header Ads

Header ADS

ब्रेकींग न्यूज-रसलपुर येथे गोवंश कत्तलखाना रावेर पोलिसांनी केला उद्ध्वस्त, चौघे ताब्यात चौघे फरार

 

Brēkīṅga-news-rasalapura-yēthē-gōvanśha-kattalakhānā-rāvēra-pōlisānnī-kēlā-ud'dhvasta-caughē-tābyāta-caughē-farāra


ब्रेकींग न्यूज-रसलपुर येथे गोवंश कत्तलखाना रावेर पोलिसांनी केला उद्ध्वस्त, चौघे ताब्यात चौघे फरार


लेवाजगत न्यूज रावेर:- रावेर तालुक्यातील रसलपूर गावात पोलीसांनी एका मोठ्या कारवाईत गोवंश कत्तलखाना उद्ध्वस्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून चौघांना ताब्यात घेतले, तर चौघे पोलीस येताच पळून गेले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ७४० किलो गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली आहेत.

अधिक माहिती अशी की, रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात मरीमाता मंदिराच्या पाठीमागे सलीम उस्मान कुरेशी याच्या घरासमोर गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस कर्मचारी कल्पेश आमोदकर,प्रमोद पाटील,सुकेश तडवी,श्रीकांत चव्हाण आणि दोन पंचांच्या पथकाने तातडीने रसलपूरकडे धाव घेतली.


पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, आठ इसम एका मोकळ्या जागेत खाली बसून गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कुऱ्हाडी आणि सुऱ्यांच्या साहाय्याने कापत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यापैकी चौघांना जागेवरच पकडले, तर उर्वरित चौघे पोलिसांना पाहून पळून गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे शेख वसीम शेख कय्युम कुरेशी (वय २५), शेख शकील शेख कलीम कुरेशी (वय २४), शेख सलीम शेख उस्मान कुरेशी (वय ६०) आणि शेख अनिस शेख अय्युब कुरेशी (वय ३२, सर्व रा. कुरेशी मोहल्ला, रावेर) अशी आहेत. पळून गेलेल्या आरोपींची नावे शेख नुरअहमद शेख सलीम कुरेशी, शेख फारुख शेख अय्युम कुरेशी, शेख समीर शेख कय्युम कुरेशी आणि शेख फरीद शेख शब्बीर कुरेशी (सर्व रा. कुरेशी वाडा रसलपूर) असल्याचे सलीम कुरेशीने पोलिसांना सांगितले.


पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख ४८ रुपये किंमतीचे अंदाजे ७४० किलो गोवंश मांस आणि चार जनावरांची कातडी, १ हजार २०० रुपये किंमतीच्या चार कुऱ्हाडी आणि ८०० रुपये किंमतीचे चार सुरे जप्त केले. जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सील करण्यात आले आणि पंचनामा करण्यात आला. जप्त केलेले मांस रावेर नगरपालिकेच्या मदतीने कचरा डेपोत नष्ट करण्यात आले. पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपींना रावेर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.