Header Ads

Header ADS

कोचुर खुर्द येथील माजी सरपंच ज्योती कोळी यांचे जात प्रमाणपत्र जप्त करण्यात यावे धुळे जात वैधता पडताळणी समितीकडे तक्रार

 

Complaint to Dhule Caste Validity Verification Committee that caste certificate of former Sarpanch Jyoti Koli of Kochur Khurd should be confiscated



कोचुर खुर्द येथील माजी सरपंच ज्योती कोळी यांचे जात प्रमाणपत्र जप्त करण्यात यावे

धुळे जात वैधता पडताळणी समितीकडे तक्रा


सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनीधी-मौजे कोचुर खुर्द तालुका रावेर येथील माजी सरपंच ज्योती संतोष कोळी (वडिलांचे नाव ब्रिजलाल)यांचा टोकरे कोळी जातीचा बोगस बनावट दाखला जप्त करण्यात यावा अशी तक्रार सह आयुक्त तथा उपाध्यक्ष दक्षता पथक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती धुळे यांच्याकडे लेखी पुराव्यानिशी तक्रार अर्ज कोचुर खुर्द ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई घनश्याम तायडे यांनी केला आहे 

२०२३ ऑक्टोबर मध्ये कोचुर खुर्द ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच पदी अनुसूचित जमाती या जागेसाठी ज्योती कोळी निवडून आल्या होत्या त्यांनी निवडून आल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या मुदतीत टोकरे कोळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करेल असे सत्य प्रतिज्ञापत्र नामनिर्देशन पत्र दाखल करताना दाखल केले होते .त्या अनुषंगाने त्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या विरोधात महाशय जिल्हा अधिकारी जळगाव यांच्याकडे मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे यांना सरपंच पदावून अपात्र करण्यात यावी अशी तक्रार दाखल करून याची सुनावणी महाशय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात होऊन मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी कोचुर खुर्द तालुका रावेर येथील सरपंच ज्योती कोळी यांना ३१मार्च रोजी अपात्र घोषित केले 

 ज्योती कोळी यांनी त्यांचा टोकरे कोळी जातीचा बनावट बोगस दाखला तात्कालीन तहसीलदार जळगाव जिल्हा जळगाव यांच्याकडून दिनांक १०/०४/१९९५रोजी दाखला मिळवला आहे .जातीचा बनावट दाखल्या संदर्भात महाशय तहसीलदार जळगाव यांच्याकडे माहिती अधिकारात दाखल्या संदर्भात माहिती मागितली असता तहसीलदार जळगाव यांनी ज्योती कोळी नावाचा टोकरे कोळी जातीचा दाखला निर्गत झाल्याची नोंद नाही .असे स्पष्टपणे माहिती अधिकारात सही शिक्यानिशी कळवले होते या माहितीच्या आधारावर जातीचा दाखला बोगस बनावट असल्याचे निष्पन्न होत असल्याने याबाबत टोकरे कोळी जातीचा बनावट बोगस दाखला जप्त करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आयुक्त तथा उपाध्यक्ष दक्षता पथक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती धुळे यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज पुराव्यानिशी करण्यात आला आहे याबाबत तक्रारदार लिलाबाई तायडे यांच्या बाजूने अँड विश्वासराव भोसले जळगाव हे कामकाज पहात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.