Header Ads

Header ADS

पत्नीची चापट खाल्ल्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांना डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला; म्हणाले, “दरवाजा बंद…”


Donald Trump's advice to French president after wife slaps him: Close the door



 पत्नीची चापट खाल्ल्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांना डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला; म्हणाले, “दरवाजा बंद…”

विदेश वृत्त -फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना काही दिवसांपूर्वी मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला होता. व्हिएतनामच्या दौऱ्यावर असताना ते हनोई विमानतळावर उतरले. विमानाचा दरवाजा उघडताच ते खाली उतरणार एवढ्यात एक हात बाहेर आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर चापट पडली. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. अल्पावधितच हा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला. मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांनीच त्यांच्या तोंडावर चापट मारल्याचे सांगितले गेले. स्वतः मॅक्रॉन यांनी हे वृत्त फेटाळून लावले. यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

Donald Trump's advice to French president after wife slaps him: Close the door


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना फ्रान्सच्या अध्यक्षांचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत विचारण्यात आले. यावर ट्रम्प म्हणाले की, ते दोघेही माझे चांगले मित्र आहेत. तसेच मी त्यांच्याबरोबर या घटनेनंतर बोललो आहे. ते दोघेही ठिक आहेत.

लेवाजगत


ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना मॅक्रॉन यांच्या व्हायरल व्हिडीओबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “मी मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. ते दोघेही खूप चांगले आहेत. मी त्यांना ओळखतो. पण त्यादिवशी काय झाले, याची मला कल्पना नाही.”

एक जागतिक नेता म्हणून दुसऱ्या जागतिक नेत्याला तुम्ही कोणता वैवाहिक सल्ला द्याल? असाही प्रश्न यावेळी ट्रम्प यांना विचारण्यात आला. स्वतः ट्रम्प यांनी तीन लग्न केलेली आहेत. त्या अनुषंगाने हा खोचक प्रश्न होता, असे काही माध्यमांनी म्हटले आहे. यावर ट्रम्प यांनीही मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले, “दरवाजा बंद असेल याची काळजी घ्या.”

  मॅक्रॉन यांनी काय स्पष्टीकरण दिले?

दरम्यान सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले होते. मात्र नंतर त्यांनी व्हिडीओची सत्यता तपासली असल्याचे म्हटले. तसेच हे जोडप्यामधील हलकेफुलके क्षण होते, असे या प्रसंगाचे वर्णन केले. मॅक्रॉन यांनीही याच प्रकारची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पत्नी आणि माझा हास्यविनोद सुरू होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.