भजन रत्न सम्राट महादेव बुवा शहाबाजकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा
भजन रत्न सम्राट महादेव बुवा शहाबाजकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा
लेवाजगत न्यूज उरण सुनिल ठाकूर -महाराष्ट्रातील सर्वांच्या परिचित नामांकित भजन रत्न सम्राट श्री महादेव बुवा शहाबाजकर यांचा वाढ़दिवस साई मंदिर वहाल येथे विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा झाला.
सकाळी 6 वाजत काकड आरती, व मंगल स्नान ह. भ. प. महादेव बुवा शहाबाजकर यांच्या हस्ते. सायंकाळी 6 वाजता धुपारती. सायंकाळी 6.30 वाजता श्री ज्ञानाई सांस्कृतिक भजन मंडळ नवी मुंबई. सादर कर्ते -भजन रत्न ह.भ.प.महादेव बुवा शहाबाजकर, सौ. मीनल (साक्षी )पाटील आणि शिष्य परिवार. पखवाज -सुधाकर पाटील, दर्शन बुवा नाईक. धस्त्रीय गायन सादर कर्ते -कु. गंधर्व पराग शहाबाजकर. तबला कु.कौस्तुभ भाग्यवंत. सितार वादक कु.जानवी पराग शहाबाजकर, पखवाज जुगल बंदी -विशाल कोळी, गौरव म्हात्रे. निवेदन सोपान राव आढाव यांच्या सुश्राव्य भजना चा कार्यक्रम पार पडला.
(जाहिरात👇)
यावेळी साई देवस्थान तर्फे भजन रत्न महादेव बुवा शहाबाजकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.
यावेळी साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री रवीशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्यां सौ. पार्वती ताई पाटील, जगन शेठ पाटील, अंनत पाटील. मो. का. मढवी,राजू मुंबई कर, श्रीकांत मुंबईकर, विश्वास पाटील आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता साई बाबाच्या शेज आरती ने झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत