रावेर येथिल शासकीय ज्वारी खरेदीचे मुहूर्त केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट मिळेना.
रावेर येथिल शासकीय ज्वारी खरेदीचे मुहूर्त केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट मिळेना
लेवाजगत न्यूज चिनावल ता रावेर ( वार्ताहर ) रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सुरू झालेली शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात मुहुर्ता ची पहीलीच मोजणी केलेल्या चिनावल येथील शेतकरी डालू टोके व उर्मिला झांबरे यांचेच पेमेंट संबंधित केंद्रा मधून मिळत नसल्याने सदर शेतकरी अडचणीत आला आहे.
या बाबतीत सविस्तर असे की चिनावल येथील शेतकरी डालू नथू टोके व उर्मिला झांबरे यांनी गेल्या खरीप हंगामातील ज्वारी शासनाने सुरू केलेल्या शासकीय ज्वारी खरेदी केंद्र कृषी येथे सुमारे चार ते पाच महिने पासून मोजून दिलेले आहे विशेष म्हणजे सदर शेतकऱ्यांची ज्वारी मोजणी सर्वाचे आधी म्हणजेच मुहूर्ताचे मोजणी झालेली आहे मात्र पेमेंट अजून पर्यंत सदर शासकीय खरेदी केंद्रातून मिळत नसल्याने शेतकरी वारंवार तिथे चकरा मारत आहे त्यांच्या मागून मोजणी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळाले मात्र डालू टोके व उर्मिला झांबरे यांना पैसे न मिळाल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे सध्या स्थितीत नवीन हंगामासाठी बियाणे व मटेरियल साठी त्यांच्याकडे पैसा नसल्याने सदर पेमेंट त्वरित मिळावे मागणी सदर पेमेंट मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे संबंधित शासकीय ज्वारी खरेदी केंद्र च्या विभागाने याची दखल घेऊन सदर शेतकऱ्याचे पेमेंट त्वरित द्यावे अशी मागणी टोके यांनी केली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत