एखाद्याने मत मांडले तर तुम्ही आयुष्य बरबाद करणार का? पुण्यातील विद्यार्थिनीच्या अटकेवर हायकोर्टाचा संताप
एखाद्याने मत मांडले तर तुम्ही आयुष्य बरबाद करणार का?
पुण्यातील विद्यार्थिनीच्या अटकेवर हायकोर्टाचा संताप
वृत्तसंस्था मुंबई-एखाद्या व्यक्तीने मत मांडले तर तुम्ही त्याचे आयुष्य बरबाद कराल का, असे ताशेरे मंगळवारी मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारवर ओढले. पुण्यातील १९ वर्षीय विद्यार्थिनीला भारत-पाकिस्तान संघर्षावर सोशल मीडियावर पोस्ट केली. नंतर तिने ही पोस्ट काढून टाकत माफीही मागितली. मात्र पोलिसांनी तिला अटक केली. याबाबत विद्यार्थिनीने हायकोर्टात धाव घेतली. न्यायालयाने ही कारवाई अत्यंत कठोर असल्याचे म्हटले. ही विद्यार्थिनी न्यायालयीन कोठडीतआहे. तिला कॉलेजमधूनही काढून टाकण्यात आले आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीतील खंडपीठाने विद्यार्थिनीच्या वकिलांना तात्काळ जामीन अर्ज दाखल करण्यास सांगितले. महाराष्ट्र सरकारने अनुचित प्रतिक्रिया देऊन एका विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवले, असे खंडपीठाने म्हटले आहे. मुलीने काहीतरी पोस्ट केले. आपली चूक लक्षात आल्यानंतर तिने माफी मागितली. तिला सुधारण्याची संधी देण्याऐवजी राज्य सरकारने तिला अटक केली आणि गुन्हेगार बनवले, असे ताशेरे कोर्टाने ओढले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत