हॉटेल मालकाच्या सतर्कतेने भुसावळला बनावट आधारकार्डवर रूम घेताना दोन बांगलादेशी तरुणी गजाआड
भुसावळला बनावट आधारकार्डवर रूम घेताना दोन बांगलादेशी तरुणी गजाआड
हॉटेल मालकाच्या सतर्कतेने प्रकार उघड एटीएस-पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था भुसावळ-मुंबईतील एका 'दिदी' च्या माध्यमातून पार्लरमध्ये नोकरीचे आमिष देत कोलकात्याहून निघालेल्या बांगलादेशी दोघा तरुणींना भुसावळच्या हॉटेलात बनावट आधारकार्डवर रूम घेताना एटीएस-पोलिस पथकाने सोमवारी रात्री अटक केली. तानिया मुळाशिर अहमद (वय २६, रा, उत्तरफान, हातीपाडा, जि. ढाका, बांगलादेश) आणि करीमा बोकुलमिया अख्तर (वय २२, रा. मोरीच्या कवय्यानगर,बाव्हमखरीया, बांगलादेश) अशी अटकेतील तरुणींची नावे आहेत. दोघी तरुणींना न्यायालयात उभे केले असता ३० मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
संशयातून हॉटेलमालकाने पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना यामागे घुसखोरीच्या मोठ्या रॅकेटचा सुगावा लागला आहे.
तरुणींविरोधात विदेशी व्यक्ती अधिनियम आणि पारपत्र अधिनियम, बनावट आधारकार्ड तयार करणे अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुधवारी निघाल्या बांगलादेशातून: २१ मे रोजी तानिया, करीमाने ओमना
बांगलादेश येथे रॉबीनची (पूर्ण नाव नाही) भेट घेतली असता त्याने, भारतात पार्लरचे काम आहे. ३० ते ४० हजार रुपये महिना मिळेल असे आमिष दिले. होकार दिल्यानंतर त्याने ढाक्यात बसची तिकिटे काढून बसवले. जाफलॉग येथे माझा मित्र अली (पूर्ण नाव नाही, रा. बांगलादेश) तुम्हाला घ्यायला येईल, तो तुम्हाला भारतात घेऊन जाईल, असे सांगितले. दोन्ही जणी जाफलॉगला उतरल्यावर अली आला व जंगलाच्या मार्गाने बांगलादेश हद्दीपर्यंत सोडून परत निघून गेला. २७ मे रोजी संध्याकाळी तरुणी हॉटेल अतिथीत पोहोचल्या आणि मोबाइलवरून आधारकार्ड दाखवत खोली मागितली. मात्र, हॉटेलमालक गितेश देव यांना कागदपत्रांबाबत संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. देव यांनी तत्काळ दोन्ही तरुणींसह बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमित बागुल करत आहे.
मुंबईच्या दिदीने सांगितले, भुसावळला उतरा गाडी पाठवते
कोलकात्यात आणले. तेथे एका हॉटेलमध्ये जलालने दोन्ही तरुणींचे फोटो काढले. बनावट आधारकार्ड तयार केले. त्यानंतर कोलकात्याहून मुंबईचे तिकीट काढून रेल्वेत बसवून दिले. मुंबईत दिदी नावाची महिला घ्यायला येईल व पार्लरमध्ये नोकरी देईल, असे सांगून दिदीचा मोबाइल नंबर दिला. प्रवासात दिदीने भुसावळात उतरा, तेथे गाडी पाठवेल असा फोन केल्याने भुसावळला उतरल्याची माहिती तरुणींनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत