भारताचा नवा कसोटी कर्णधार ठरला! इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी
भारताचा नवा कसोटी कर्णधार ठरला! इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी
लेवाजगत न्यूज मुंबई -आयपीएल २०२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच या स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. २० जूनपासून दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे कर्णधारपद युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आले आहे.
भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार
काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाला नवा कर्णधार मिळणार हे स्पष्ट होतं. पण कर्णधारपदासाठी काही नावं चर्चेत होती. ज्यात शुबमन गिलसह, जसप्रीत बुमराह , केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचा समावेश होता. अखेर बीसीसीआयने ही जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवली आहे. शुबमन गिलकडे भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड २०२५ कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: २० ते २४ जून – हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी: २ ते ६ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी: १० ते १४ जुलै – लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी: २३ ते २७ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: ३१ जुलै ते ४ ऑगस्ट – द ओव्हल, लंडन
या खेळाडूंना मिळाली संधी
या दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू नसणार आहेत. या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आली आहे. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. यासह करूण नायर, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी यांसारख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यासह वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्या जागी अर्शदीप सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर/उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करूण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, अर्शदीप सिंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत